घरगुती धान्याला कीड लागू नये म्हणून धान्याची साठवणूक कसे कराल

घरगुती धान्याला कीड लागू नये म्हणून धान्याची साठवणूक कसे कराल dhankid

भारताचे अन्नधान्य उत्पादन अंदाजे 290 दशलक्ष टन पेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर जवळपास 10 ते 15 टक्के अन्नधान्याची नासाडी व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे व त्यापैकी सर्वात जास्त नासाडी साठवणूक व्यवस्थित न केल्याने होते. म्हणूनच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या उद्दिष्टांच्या अभ्यासानंतर असे लक्षात येते की वाढत्या लोकसंख्येला मुबलक प्रमाणात धाण्याचा नियमित पुरवठा होण्यासाठी धान्य साठवण्याचे कडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

आज भारत गरजेपेक्षा जास्त धान्य पीकवित आहे. त्यापैकी काही प्रमाणात निर्यात देखील करीत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे धान्य उत्पादनात वाढ होत आहे. उत्पादनात होणारी वाढ असले तरी उत्पादनावर होणारी नासाडी सुद्धा कायम आहे याचा अर्थ व उत्पादन वाढीस सोबतच नासाडी देखील वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे धान्याची अयोग्य साठवणूक यामध्ये सर्वसाधारणपणे 60 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते हे परिस्थिती जवळपास बऱ्याच देशांमध्ये पाहायला मिळते. भारतामध्ये उत्पादित होणाऱ्या धान्य पैकी जवळपास 70 टक्के पेक्षा जास्त शेतकरी स्वतःसाठीच साठवण करतात हे साठवण घरगुती स्तरावर करतात. शेतकरी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून साठवणूक करतात अशा पद्धतीने केलेले साठवण पूर्णतः सुरक्षित होतो हवाबंद नसल्याकारणाने घरगुती पद्धतीने नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. धान्याचे साठवणुकीत धान्याचे कीटक, उंदीर, ओलावा व इतर अनेक कारणांमुळे नुकसान होते धाण्याचे काळजीपूर्वक साठवण केल्यास जास्त सुरक्षित राहू शकते. धान्य व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पिकाची कापनी परिपक्वतेनुसार ठरलेल्या वेळेवर करावी नंतर साठवणुकीसाठी धान्यनुसार त्यामध्ये ओलावा राखावा. धाण्यातील ओलावा योग्य राखण्यासाठी गरज असल्यास ते वाळवावे. सर्वसाधारण धान्य साठवणुकीसाठी 10 ते 14 टक्के धान्य नुसार ओलावा राहतो. ज्या ठिकाणी धान्या साठवायचे आहे त्या रिकाम्या फटीमध्ये गॅप तसेच साठवणुकीतील भिंतीतील फटीमध्ये कीटक शिरकाव करतात तसेच साफसफाई न करता साठवणूक केल्यास धान्य खराब होण्याची दाट शक्यता असते अशा परिस्थितीत साफसफाई कडे बारकाईने लक्ष पुरवणे गरजेचे आहे.

कीड लागू नये म्हणून उपाय योजना
धान्य काढल्यानंतर त्यांना चांगलं वाडवा आणि साफ करा धान्य साठवण की पूर्वी साठवणुकीची साधने किंवा जागा साफ करून कीड विरहित करा. धान्य साठवलेल्या जागेत नेहमी स्वच्छता ठेवा. धाण्याची ठराविक कालावधीनंतर तपासणी करा. धान्याला ओलावा लागू नये यासाठी जमिनीपासून उंच जागेवर आणि भिंती पासून दूर ठेवा. पावसाळ्यात धान्या हवा बंद ठेवा. उन्हाळ्यात धाणाला मोकळी हवा लागेल असे ठेवा. नवीन धान्यामध्ये ओलावा अधिक असतो भारतामध्ये उन्हाळ्यात पातळ सुती कापडावर उन्हात गहू, तांदूळ,डाळी, ज्वारी,बाजरी नाचणी इत्यादी वाळत घालावे दोन-तीन तासांनी त्यावर हात फिरवावा. एक ते तीन दिवसाचे वाडवावे कडकडीत वाढले की ते उन्हातुन काढावे खोलीच्या तापमानाला आले की भरून ठेवावे. असे केल्याने धान्य टिकवण्यासाठी अन्य काही वेगळा उपाय लागत नाही. रासायनिक गोळया इथे वापरू नये कारण ही रसायने धाण्यामध्ये सोडले तर निघत नाहीत.धान्यातील पोषक अंश निघून जातो त्यापेक्षा पारंपरिक पद्धतीचा वापर करावा.

पावसाळ्आ असल्याने आणि अंगण छोटे असल्यामुळे धान्य वाडवणे शक्य होत नाही अशा वेळेस खालील पद्धतीने साठवण करावी. कडुलिंब ची पाणी ताजी घेऊन धुऊन सावलीत सुकवावे हा सुकलेला पाला धाण्यात मिसळावा. धान्याच्या पेटी ठेवणार आहे त्याच्या तळाशी पानांचा जाडसर थर घालावा व धान्य घालावे व सर्वात वर पुन्हा वाळलेला पाला घालावा. त्यामुळे कीड लागत नाही, त्याची वाढ होत नाही हा डबा मात्र हवाबद असावा. हवाबंद डबा किंवा कोठी असल्यामुळे त्यात किडे मुंग्या आत प्रवेश करू शकणार नाहीत आणि वातावरणातील आद्रतेचे त्या धान्याचा संपर्क होणार नाही. जेव्हा जेव्हा धान्य बाहेर काढायचे असेल तेव्हा हात आणि भांडी स्वच्छ आणि कोरड्या असावेत या पद्धतीने साठविल्यास धान्यातील आद्रता कमी राहते.किडे होत नाहीत आणि झाल्यास प्रजनन क्षमता कमी होते. विशेषता उन्हात वाडवल्याने पण त्यामुळे धान्याची गुणवत्ता अबाधित राखले जाते. सूक्ष् जीव घटकांचे मूलमंत्र इत्यादी विष समान पदार्थ वाढत नाहीत व आपल्याला आरोग्य टिकविण्यास मदत होते याबरोबर अजूनही पर्याय आहेत गहू तांदूळ कडधान्य ज्वारी बाजरी नाचणी ला एरंडेल चोडावे त्याचप्रमाणे एक किलो धाण्यासाठी 10 मिली हे तेल इतके असावे त्याला हाताला चोडून द्यावे आणि ते धन्याला लावावा धान्याला एरंडेल हळू शोषले जाते धान्य चिकट राहत नाहीत आणि पोटा साठी हितकर आहेत काही वेळेस एरंडेल प्रमाणे कडुलिंब तेलाचाही वापर होतो पण ते थोडे कडवट असते अशा वेळी कडूलिंबाची पाने वापरली जातात.

Leave a Comment